fbpx

‘स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे, धनंजयराव चिडले?’

टीम महाराष्ट्र देशा – भाजप नेते आशिष शेलार सध्या सोशल मिडीयावरून राजकीय नेत्यांवर ट्वीटरास्त्र सोडत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘जाणते आजोबा’ म्हणत शरद पवार यांचाय्व्र टीका केली होती. टर काल चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं होतं. तर आज शेलार यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला. स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करतात असा टोला आशिष शेलार यांनी मुंडेना लगावला आहे.

नेमकं काय आहे आशिष शेलार याचं ट्वीट? 

रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले. स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे, धनंजयराव चिडले? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ?वो तो देखलो !..लढ धन्नो..!! असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं.

आशिष शेलार यांच्या या  टीकेला  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ट्विटरवरुनच उत्तर दिले आहे. मुंडे म्हणाले, “काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जायना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले” असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.