Share

Ashish Shelar । “सध्या पेंग्विन सेनेला कावीळ झालीय दिसेल ते…”; आशिष शेलारांचा ठाकरेंवर निशाणा

Ashish Shelar । मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे विरूद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सामना पहायला मिळत आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यात एकमेकांवर टीका होताना दिसत असते. तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्ष विरुद्ध विरोधीपक्ष असा वाद पेटलेला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईतील विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावणार नाहीत, असं म्हणत अशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वरळीच्या मैदावर आम्ही अतिक्रम केल्याचा आरोप होतो आहे. मात्र, यात अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसल्याचं शेलार यावेळी बोलताना म्हणाले. सध्या पेंग्विन सेनेला कावीळ झालीय दिसेल ते त्यांना पिवळचं दिसतं असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केलीय.

उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत विचारल्यास ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबीयांची संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आलीय ती एका मराठी माणसाने केलीय हा एक उठाव आहे. जवळच्याच व्यक्तीनं ही मागणी केलीय वाद विवाद आणि अशांतता करण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटातील नव्याने आलेल्या बांडगुळांकडून हे नवीन वाद निर्माण केले जात आहेत. राज्यातील मूळ शिवसैनिक हा एकनाथ शिंदेंबरोबर आहे. यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची होणार असल्याचे ते म्हणाले.

विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. वरळीच्या आमदारांनी मराठी साहित्य, संस्कृती, लोककला याबाबत केलेला एक कार्यक्रम दाखवावा. जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे? असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या : 

Ashish Shelar । मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे विरूद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सामना पहायला मिळत आहे. ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now