‘कोकणात भगवा फडकला…पण तो भाजपाचा!’

uddhav thakrey vs ashish shelar

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आज निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत असून जवळ-जवळ सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर झाले आहेत.

कोकण हा गेली अनेक दशके शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यंदा भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन केली. ग्रामपंचायतमध्ये पक्षांचं निवडणूक चिन्ह वापरलं जात नसलं तरी पुरस्कृत पॅनेल्समध्ये निवडणूक होते. महाविकास आघाडीतील हे तिन्ही पक्ष वेगळे लढले होते.

कोकणात भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘कणकवली विधानसभा 39 पैकी 27 तर सावंतवाडी 16 पैकी 9, तसेच कुडाळ 15 पैकी 9 अशा एकुण 70 पैकी भाजपाने 45 ग्रामपंचायती जिंकल्या तर सेनेला केवळ 20 आणि राष्ट्रवादीला 1 ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे “आम्हीच” म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण!’ अशी टीका त्यांनी केली आहे.

यासोबतच, ‘रत्नागिरीतील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील 1492 उमेदवारांपैकी भाजपाचे 536 ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले तर 59 गावात भाजपाचे सरपंच बसणार! रत्नागिरीतही घवघवीत यश! शिवसेनेचा आभासी फुगा फुटला कोकणात भगवा फडकला पण तो भाजपाचा!!’ असा चिंता देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या