आमचे मुख्यमंत्री फडणवीसच, आशिष शेलारांची सारवासारव…

shelar - fadnvavis

पुणे : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या ‘कतृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भाजप नेते आशिष शेलार यांनी कतृत्वान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, या भावनेला समर्थन असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांना भावी मुख्यमंत्री संबोधले होते. त्यावर शेलार यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं होत.

त्यानंतर मात्र आता आपल्या विधानावरून ‘यु टर्न’ घेतला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री म्हणून उमेदवार राहतील,’ ‘ते’ विधान फक्त कार्यक्रमापूरते मर्यादित होते, असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या