‘मनसे भगव्यासोबत आली तर त्यांच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूतीच’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेने आपल्या झेंड्यात बदल केले असून, दोन नवे प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला दिले आहेत. या झेंड्यामध्ये भगव्या रंगाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच उद्या (ता. २३) मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या राजकारणाची दिशा कोणत्या बाजूने वळवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपनेते आशिष शेलार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनसे भगव्यासोबत आली तर त्यांच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूतीच असेल. तसेच मनसेची वाटचाल हिंदुत्वच्या दिशेने आहे की नाही हे लवकरच कळेलच. जर ते भगव्या सोबत असतील तर स्वागत आहेत.” त्याचप्रमाणे महाराष्ट्रतला घटना क्रम पाहिल्यावर पोलिटिकल किडा कोण यावर आमचं लक्ष आहे. तो प्रभादेवीहून येतोय की काय यावर आमचं लक्ष असणार आहे, असे म्हणत शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Loading...

तसेच शेलार यांनी यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफवरच्या निर्णयावरही भाष्य केले आहे. ‘ मुंबई २४ तास सुरू ठेवायची ठीक आहे त्याचा वापर जर रोजगारवर जगणाऱ्या घरांवर किंवा व्यापार हितासाठी होणार असेल तर ठीक आहे, पण सुपर मार्केट, बार आणि पब साठी असेल तर याला भाजपचा कडाडून विरोध असणार, हे निश्चित.

तसेच शाळेत संविधान वाचलं जाण्याच्या निर्णयाच आम्ही स्वागत करतो,समर्थन करतो. मात्र देशभक्तीच्या नावाखाली भारत माता की जय, जय हिंद कोणी म्हणाले तर विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका,असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण