…म्हणून आशिष शेलारांनी केले मुख्यमंत्र्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचे तोंडभरून कौतुक

tejas thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधलीय. या माश्याची ही 20 वी प्रजाती आहे. आणि तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे.

तेजस यांच्या या कामगिरीचे चांगलेच कौतुक होत आहे.भाजपनेते आम.आशिष शेलार यांनी देखील तेजस यांचे कौतुक केले आहे. सामना या वृत्तपत्रातील बातमी शेअर करत ट्विटरवरुन शेलार यांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलं आहे. शेलार म्हणाले, “जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे.”

वाइल्ड लाइफ हा तेजस यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव दिले आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातींची नावे आहेत.या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-