काँग्रेस नेत्यांपाठोपाठ आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

ashish shelar and sharad pawar

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हा दिल्ली दौरा सद्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. थोड्या वेळेपूर्वीच महाराष्ट्रातील नेत्यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. तर या पाठोपाठ भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी देखील पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली आहे. मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांनी पवारांची भेट घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या विजय वडेट्टीवार यांना घेऊन अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी कांग्रेस मधील बदलावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजत आहे. तब्बल पाऊण तास या नेत्यांमध्ये खलबतं झाली आहेत.

तर, या नेत्यांच्या पाठोपाठ भाजपच्या आशिष शेलार यांनी पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुले अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दिल्लीतील ६ जनपथ या पवारांच्या निवासस्थानी या नेत्यांमध्ये सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ बैठक झाली आहे. २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या भेटी मागे या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडं, राज्यात ईडीच्या नोटिशींमुळे तापलेल्या राजकारणावर चर्चा झाल्याची शक्यता पुढे येत आहे. या आधी देखील शेलार-पवार यांच्या अचानक झालेल्या भेटी या चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

महत्वाच्या  बातम्या