‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’

The dream of the house of the Mumbai residents will be fulfilled

टीम महाराष्ट्र देशा – पर्यावरण प्रेमाच्या शपथा घेता आणि पर्यावरण पुरक सौर ऊर्जेच्या निर्मितीला नवा कर लादायचे ठरवता.. या सरकारचे.. ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ असं झालंय असंच म्हणायचं का? अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.

महावितरणकडून सौरउर्जा पॅनल बसवणाऱ्या निवासी सोसायटी कडून ४.४६ ते ८.८६ रुपये प्रती युनिट ग्रीड सपोर्ट शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. याचा विरोध करणारं पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला दिलं आहे. याबाबतची माहिती शेलार यांनी ट्वीटर वरून दिली.

या पत्रात शेलार यांनी भारतात आणि जगात सौर उर्जेच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकांची माहिती दिली आहे.