Ashish Shelar on Sanjay Raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या (Maharashtra-Karnataka border dispute) मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. हा नव्याने निर्माण झालेला वाद स्क्रिप्टेड असल्याचे राऊत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या मनातील संतापावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी घणाघात केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. एकही गाव महाराष्ट्रातून जाण्याचा प्रश्न येत नाही. सर्वोच्च न्यायालयात देखील आम्ही आमची भूमिका मजबूत मांडली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या वर नाहीत, अशी तंबी देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. हाताशी काही राहीलं नाही म्हणून संजय राऊत तुम्ही आगलावेपणा करु नका”
काय म्हणाले होते संजय राऊत –
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रावर अचानक हल्ला केला आहे. याच्यामागे फार मोठ कारस्थान आणि षडयंत्र आहे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे या सरकार विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावरचे लक्ष विचलित व्हावे, शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा. म्हणून बोम्मईंना पुढे करुन महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा. हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे.”
संजय राऊत म्हणाले की, भाजप हा शिस्तीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री दुसर्या भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध आक्रमक झाल्याचे यापूर्वी कोणी पाहिले आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कधी काही बोलल्याचे कोणी पाहिले आहे का? पण आज कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Oil Free Samosa | तेलाचा वापर न करता ‘या’ पद्धतीने बनवा भाजलेले समोसे
- Sanjay Raut | “मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Santosh Bangar | लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन ; संतोष बांगर यांची पुन्हा कर्मचाऱ्यांना दमदाटी
- Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, पुढील 48 तास महत्वाचे
- NCP on Eknath shinde | “मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती जादूटोणा, मंत्र-तंत्र करत असेल तर…” ; राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर टीका