सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय : अॅड. आशिष शेलार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात उपस्थितांना भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून देण्यात आलेल्या घोषणा पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला होता.

त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असल्याचं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सत्तेत बसल्यावर विरोधकांनी आवाज उठवलेल्या मुद्यांकडे लक्ष देण्याएवजी त्यावर विकृतपणे भाष्य करणे यातूनच सत्तेचा माज दिसून येतो. मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आमचा घसा कोरडा काय, फुटला तरीही आम्ही शेतकरी आणि महिलांसाठी बोलू, असा इशारा त्यांनी यावेळी सरकाराला दिला.

Loading...

तर लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणत असताना प्रत्यक्षात हजारोंची यादी समोर आली आहे. सरसकट कर्जमाफी, सात बारा कोरा या सर्व त्यांच्या घोषणा आहे. तर आम्ही वचनाला न फिरणारे असल्याचं म्हणणारे मुख्यमंत्री बांधावर जाऊन दिलेलं वचन का विसरले? त्याची आठवण त्यांना करून देणार असल्याचे सुद्धा शेलार म्हणाले.

तसेच, ना शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले ना चिंता मुक्त.. महिलांवरील अत्याचारांची रोज तर मालिकाच सुरु आहे. अशा आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने आज राज्यभर एल्गार पुकारला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश