Share

Ashish Shelar | “चर्चगेटच्या गाडीत बसायचं आणि मुलुंड आलं का विचारायचं”; आशिष शेलारांचा आव्हाडांवर निशाणा

Ashish Shelar | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे. यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका केलीय.

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध? “हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचं स्टेशन आलं का, असं विचारण्यासारख आहे’, असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना टोला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, जर जितेंद्र आव्हाड निर्दोष आहेत तर त्यांनी कायदेशीर बाजू लढावी. प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा असते. निर्दोषत्व सिद्ध करता येत नसले तेव्हा असे वेडे चाळे सूचतात असं शेलार म्हणालेत.

दरम्यान,  या आरोपांचा आणि आमदारकीचा संबंध नसल्याकंग शेलार म्हणालेत. सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी कुटुंबाला, आरोप प्रत्यारोप, विनयभंग, दादागिरी करू नये. असं केल्यास त्यावर कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवलंय. म्हणून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतोय, असं मत आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना मांडलं.

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now