जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके; शेलारांनी उडवली पवारांची खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी माघार घेतल्याच्या मुद्द्यावरून सोशल मिडीयावर अजूनही खिल्ली उडवली जात आहे. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके, आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, अशा शब्दात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांची खिल्ली उडवली आहे.

एका नातवासाठी पवारांना माघार घ्यावी लागली असतानाच दुसऱ्या नातवाने विरोधात भूमिका घेतल्याने पवार कुटुंबातच सारे काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली. नेमका हाच धागा पकडत शेलार यांनी पवार यांच्यावर शरसंधान केले आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ?
‘एक नातू म्हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा…दुसरा नातू म्हणाला आजोबा आजोबा मीच “पार्थ” मीच लढणार… आजोबांना होती ताईंची काळजी…दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोबांच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके!’, असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.