सिंह आणि वाघ भेटले, तर लांडग्यांनो तुमचं काय गेलं?; शेलारांचा अजित पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शाहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास गुजरातच्या गांधीनगर मध्ये उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी लावलेल्या या उपस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला मुबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनीही प्रतिटोला लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले,’ सिंह आणि वाघ एकमेकांना भेटले! गांधीनगरच्या मैदानात भेटले तर भेटू द्या,बसले तर बसु द्या,दिसले तर दिसून द्या, लबाड लांडग्यांनो मला सांगा,त्यात तुमचं काय गेलं?, बारामतीच्या दादांच आणि काँग्रेसच्या पावट्यांचं डोक कशासाठी इतकं गरम झालं? सांगा मला यात तुमचं काय गेलं?’ अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठकरे हे अमित शहांचा उमेदवारी अर्ज दाखल करणाया उपस्तिथ राहिले होते त्यावेळी ठाकरे यांनी आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे, असं सांगत भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केलं आहे. याच मुद्द्यावरून अजित पवार यांनी ट्वीट करून टीका केली होती ते म्हणाले,’ ५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे.