Share

Ashish Shelar | “वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन आणि…”; अशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्ला

Ashish Shelar | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच दुषित झालं आहे. सगळीकडे निवडणुकांचं वार घुमू लागलं आहे. त्यामुळे सर्व पक्ष आगामी निवडणूकांच्या तयारीला लागले असल्याचं दिसून येतं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधरी पक्षनेत्यांमध्ये दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगत चालली आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अशिष शेलार (Ashish Shelar)

जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावणार नाहीत, असं म्हणत अशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.वरळीच्या मैदावर आम्ही अतिक्रम केल्याचा आरोप होतो आहे. मात्र, यात अतिक्रमणाचा कोणताही संबंध नाही.

मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याशी आमची नाळ जुळली आहे. विशेषत: वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन आणि पार्टी यापुढे काहीही दिसत नाही, असंही अशिष शेलार यांनी म्हटलं आहे. जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच्या अपयशावर ते सतत बोलत असतात आणि वर्तमान पत्रातून लिहित असतात. ते मुंबईत दिवे लावण्याच्या प्रकाश उत्सवाच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाही.

दरम्यान, अशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच दुषित झालं आहे. सगळीकडे निवडणुकांचं वार घुमू लागलं आहे. त्यामुळे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now