fbpx

पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शेलार आज सकाळीच राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर गेले होते.दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील समोर आलेला नाही मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घरी जाऊन भेट घेतली होती. शरद पवार हे कुटुंबासह आले असले तरी शेलार आणि पवार या दोघांमध्ये पाऊण तास राजकीय चर्चा झाली होती. हि पार्श्वभूमी असताना राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात इतक्या गुप्तपणे झालेल्या या भेटीमागे नक्की काय असावे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राजकारणातील दोन महत्त्वाच्या पदांवरील या नेत्यांच्या भेटीला नक्कीच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभेत केलेल्या भाषणावर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र सोडण्यात आले होते. आशिष शेलार यांनी ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशा शब्दात समाचार घेतला होता.

3 Comments

Click here to post a comment