‘सुट्टी बिर्याणी खायला मिळालेली नाही, संघातील खेळाडुंचं पोट सुटलं तर चालणार नाही’

ashish-nehra-announce-retirement latest updates

टीम महाराष्ट देशा – देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. दररोज  देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

याचा फटका सर्वच क्रीडा स्पर्धांना बसला आहे. कारण खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्व क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धाही रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. १५ एप्रिलनंतरही आयपीएल होणार की नाही याबाबत माहिती नाही.

सध्या सर्व भारतीय खेळाडू आपल्या घरात राहुन परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने संघातल्या गोलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे. आशिष नेहरा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आशिष नेहराच्या मते हा काळ हा भारतीय गोलंदाजांसाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे. स्वतःचा फिटनेस कायम राखायचा आणि सराव सुरु ठेवायचा असे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

भारतीय गोलंदाजांनी या काळात आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवायला हवं. ज्यावेळी क्रिकेट पुन्हा सुरु होईल तेव्हा कोणीही वाढलेली ढेरी घेऊन मैदानात उतरु नका. सध्या सुट्टी मिळाली आहे याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला जी गोष्ट आवडते ती खात सुटायचं.

यावेळी नेहरा म्हणाला धावणे हे गोलंदाज साठी सर्वात महत्वाचे आहे, आणि इतर खेलाधून पेक्षा हा काळ जलद गोलंदाजांसाठी खूप आव्हानात्मक आहे. तो पुढे म्हणाला.

आशिष नेहरा, झहीर खान यासारख्या माणसांचं पोट सुटलं तर चालणार आहे. पण सध्या जे खेळाडू खेळत आहेत त्यांना असं करुन चालणार नाही. सुट्टी बिर्याणी खाण्यासाठी मिळालेली नाहीये हे सर्वांनी लक्षात ठेवावं.”  या काळात भारतीय खेळाडूंनी सतत व्यायाम करत राहणं गरजेचं असल्याचंही नेहराने सांगितलं.

हेही पहा –