मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदांची शपथ घेऊन जवळपास एक महिना उलटला आहे. तरी अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्या नसल्याने अनेक खात्यांची कामे रखडली आहेत असाही आरोप केला जात आहे. आता या आरोपांना एकनाथ शिंदे गटातील आमदार उत्तर देत आहेत. शिंदे गटातील बंडखोर आमदार आशीष जैस्वाल यांनीही सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला ही जोरदार उत्तर दिले आहे. त्याचबरोबर राज्यातील काम व्यवस्थितरित्या सुरू आहे. विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे. असेही जैस्वाल म्हणाले.
सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री कायम झटत आहेत. सध्या राज्यात काही ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसातून २०-२० तास काम करत असल्याचेही जैस्वाल यावेळी म्हणाले. २४ तास उपलब्ध असलेला मुख्यमंत्री या शब्दांत यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांचे कौतुक केलेले होते.
यावेळी बोलताना आशीष जैस्वाल यांनी शिंदे-फडणवीसांची तुलना थेट क्रिकेटशी केली. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या जोडीशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची तुलना केली. ते म्हणाले की, ही जोडी सचिन तेंडुलकरप्रमाणे निर्णयांचे फोर, सिक्स मारत असल्याचे जैस्वाल म्हणाले. हे दोघेही राज्यासाठी चांगले निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, यावर वरिष्ठच सांगू शकतील असे सांगत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त, राज्याला… – जयंत पाटील
- Nitesh Rane : तुम्ही गुंगीत होता, मग मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल!
- Prasad Lad | आजची मुलाखत म्हणजे बॅट पण माझी, बॉल पण माझा,अंपायर पण माझा ! – प्रसाद लाड
- Neeraj Chopra : भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर
- Uddhav Thackeray | मी आजारी असताना माझ्या पाठीमागे षडयंत्र रचलं गेलं – उद्धव ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<