अशी ही बनवाबनवीची यशस्वी ३ दशक .

ashi hi banva banvi 29 years complete

जोडा खूप चांगला आहे, तोंडावर मारण्यासारखा, हा माझा बायको, हे संवाद तुम्हाला आठवता का ? ९० च्या शतकात मराठी माणसाला खळखळून हसवणारा व प्रत्येकाच्या लक्षात राहणारा चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी. आज या चित्रपटाने २९ वर्ष पूर्ण केले आहेत.
गेली ३ दशक हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच मनोरंजन करीत आहे. आताच्या काळात विनोदाची पातळी घसरत असताना, ९० च्या शतकात आलेला हा सिनेमा त्याच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडून गेला आहे. अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे अशी ही बनवाबनवी .

अशी ही बनवाबनवी हा सचिन पिळगांवकरने दिग्दर्शित केलेला एक लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट असून अजूनही रसिकांत लोकप्रिय आहे. सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका प्रचंड गाजल्या.

Loading...

आताच्या अनेक रियालिटी शो मध्ये अनेक पुरुष स्त्री भूमिका साकारतात, विनोदासाठी कोणतेही पातळी गाठली जाते. पण सचिन ,लक्ष्याने वटविलेल्या पार्वती व सुधा या भूमीका अजरामर आहेत.लक्ष्मीकांत बेर्डे , सचिन पिळगांवकर, अशोक सराफ,सुशांत रे,सुप्रिया पिळगावकर,प्रिया बेर्डे ,आश्विनी भावे या सारख्या नामवंत मराठी कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. खिळवून ठेवणारे कथानक ते ही विनोदी शैलीत यामुळे अशी ही बनवाबनवी मराठी सुपर हिट झाला.

ही आहेत अशी ही बनवाबनवी चित्रपटातील गाजलेली गाणी.
हृदयी वसंत फुलताना,
ही दुनिया मायाजाल
अशी ही बनवाबनवी
कुणीतरी येणार येणार गं

हे आहे या चित्रपटातील गाजलेले संवाद

धनंजय माने इथेच राहातात का?…शंतनू…आणि या मिसेस बालगंधर्व
अजून बारका नाही मिळाला का?… (शंतनू स्टूल घेऊन येतो तेव्हा)
जाऊबाई.. इतक्यात नका जाऊ बाई जाऊबाई..
झुरळ…तशी आपल्या ऑफिस मध्ये झुरळं जरा कमीच आहेत.

आणि हा माझा बायको…
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.. विश्वास सरपोतदार.
विश्वास सरपोतदार :- तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?
धनंजय माने :-हो, जे काही आहे ते आम्ही बरोबरच नेऊ, तुम्हाला नाहीतरी त्याचा काय उपयोग?
मी सोलकर, सोलकर, सोलकर दर्याची राणी.

सरपोतदार : बरे झाले आठवण झाली, मी तुम्हाला औषधासाठी दिलेले सत्तर रुपये परत करा.
माने: मी तुम्हाला म्हंटल होता ना, तो इस्राईल चा माझा मित्र, तो परवाच एका अपघातात वारला
हो…तुम्ही दिलेले रुपये पण वारले.
सरपोतदार: हा हालकटपणा आहे माने !

मी कोल्हापूरला असताना कुस्त्या खेळायचे.
सारखं सारखं एकाच झाडावर काय आहे?
शंतनू ही कोण?
तुमचे ही आमच्या मंडळी सारखेच आहे.
मी आजकाल कमवता नाही गमवता आहे
जोडा खूप चांगला आहे, तोंडावर मारण्यासारखा
तेरी मां, मेरी मां

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने