fbpx

आ. शरद सोनावणे यांना विरोध करण्यासाठी आशाताई बुचके मोताश्रीवर

टीम महाराष्ट्र देशा : येत्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण एकमेव असणारा आमदार देखील आता पक्षाला सोडचिठी देण्याच्या मार्गावर आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसे पक्षाकडून आमदार शरद सोनावणे निवडून आले होते पण आता शरद सोनावणे मनसेला सोडचिठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत.

सोनावणे शिवसेनेत येण्याआधी ‘मोतीश्री’वर त्यांना विरोध करण्यासाठी जुन्नरच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके मोताश्रीवर पोहोचल्या आहेत. शरद सोनावणे यांना पक्षात घेण्याआधी शिवसैनिकांना विश्वासात घेतलं जाईल, असं आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशाताईंना दिलं. आशाताई यांनी याआधी 2014 साली जुन्नर विधानसभा निवडणूक लढवली होती.