fbpx

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा

टीम महाराष्ट्र देशा : भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी…एक एक पाऊल टाकत आता विठ्ठलाचं रुप पाहण्यासाठी आता डोळे आतूर झाले आहे. आज आषाढी असल्यामुळे पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलं आहे. अलोट गर्दी पंढरपुरात झाली आहे. चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. अशी इच्छा घेऊन आज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहे.

आषाढी एकादशी निमित्तानं आज पंढरपुरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीया पूजा करण्यात आली. रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली रुक्मिणी मातेच्या नित्यपुजेचा मान पंढरपुरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांना मिळाला.

विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचा मान वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून लातूरमधील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि प्रयागाबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला. गेली 20 वर्षे हे दाम्पत्य वारी करत आहे.