जुन्नर शिवसेनेत भूकंप ; आशा बुचके समर्थकांनी दिले सामुहिक राजीनामे

aashatai buchke

पुणे : पुणे जिल्हा शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके यांच्यावर ठेवण्यात आला आहे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे.

दरम्यान, जुन्नर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बुचके समर्थकांच्या बैठकीत शिवसेना पक्षाकडून आशाताई बुचके यांच्यावर झालेल्या या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली याचा आम्ही निषेध करतो, असे सांगत या कारवाईच्या विरोधात आशाताई बुचके समर्थक जुन्नर शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख शिवदर्शन खत्री, माजी स्वीकृत नगरसेवक सुजित परदेशी तसेच आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

जुन्नर शहर संघटक कुलदीप वाव्हळ, ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष शैलेश बनकर, विभागप्रमुख पुष्कराज जंगम, सम्राट कर्पे, चंद्रकांत सोनवणे, मुकेश परदेशी, मंगेश साळवे, अतुल काशीद, अनिल पुंडे, चंद्रकांत फलके, रोहन करडिले, शंकर जणानी, कुतुब शेख, राहुल पुरवंत आदींसह शिवसैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत.

हकालपट्टी केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. हकालपट्टी झाली तर काय झालं… आता रणांगणातून माघार नाही.. विधानसभा लढवणारच, अशी आक्रमक भूमिका बुचके यांनी घेतली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत