आशा भोसलेंची नात जनाईची ग्लॅमरस अदा; बॉलीवूड एन्ट्रीच्या रंगताहेत चर्चा

आशा भोसलेंची नात जनाईची ग्लॅमरस अदा; बॉलीवूड एन्ट्रीच्या रंगताहेत चर्चा

Janayee

मुंबई : सुमधूर आवाजाने सर्वपरिचित असलेल्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. आपल्या जादुई आवाजामुळे चर्चेत येणाऱ्या आशा भोसले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नातीमुळे म्हणजेच जनाईमुळे चर्चेत येत आहेत. आशा भोसले यांच्या नातीचं नाव जनाई असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आशाजी यांची नात जनाई भोसले सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. बऱ्याचदा जनाई तिचे ग्लॅमरस फोटो देखील शेअर करत असते. जनाई संगीत क्षेत्रात फारसं नाव कमावू शकली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आशा भोसले यांनी संजय लीला भन्साली यांची भेट घेतली असून जनाईच्या डेब्यूबद्दल त्यांनी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे. जनाईने देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरसाठी गाणं गायलं होतं. त्यामुळे ती विशेष चर्चेत आली होती. जनाईने संगीतासोबतच शबाना आझमी यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

ती सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो शेअर करत असते. तिला फिरण्याची प्रचंड आवड असून कोणत्याही नव्या ठिकाणाला भेट दिल्यावर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते चेहऱ्यावरील निरागस भाव अनेकांचं लक्ष वेधून घेतात. दरम्यान चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या आगामी चित्रपटातून जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असं म्हटलं जात असून जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो तसेच आशा भोसले यांच्यासह शेअर करत असल्याने नेटकरयांकडून भरपूर लाईक, कमेंट केले जातात.

महत्वाच्या बातम्या