‘संन्याशाला भारतरत्न मिळाला नाही हे दुर्देव’

baba ramdev

टीम महाराष्ट्र देशा : स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न मिळू नये हे दुर्देव आहे, अशी खंत योगगुरू बाबा रामदेव व्यक्त यांनी व्यक्त केली. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा होता. पुढच्या वर्षीतरी किमान एखाद्या संन्याशाला हा पुरस्कार देण्यात यावा, असा माझा केंद्र सरकारकडे आग्रह असेल,’ असं रामदेव बाबा म्हणाले.

केंद्र सरकारने आज रात्री उशिरा ‘पद्म’ पुरस्काराची घोषणा केली. ११२  पुरस्कार विजेत्यांमध्ये चार ‘पद्मविभूषण’, १४ ‘पद्मभूषण’ व ९४  ‘पद्मश्री’ विजेत्यांचा समावेश आहे. चार ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये पुरंदरे यांचाही समावेश आहे. त्यामध्ये प्रणब मुखर्जी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर, बाबा रामदेव यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिनंदन केले.तसेच, प्रवण मुखर्जी यांना भारतरत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुकही केले.

मात्र, गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न मिळू नये हे दुर्देव आहे, अशी खंत योगगुरू बाबा रामदेव व्यक्त यांनी व्यक्त केली. तसेच, निदान पुढच्यावर्षी तरी एखाद्या सन्याशाला भारतरत्न द्या, अशी आग्रही मागणी बाबा रामदेव यांनी केली. तसेच २०१९ मधील निवडणुकीत काट्याची टक्कर होऊ शकते. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका. देशाला शैक्षणिक, आर्थिक, चिकित्सक आणि अन्य गुलामगिरीतून स्वतंत्र मिळावा यासाठी संकल्प करा, असेही यावेळी बाबा रामदेव म्हटले.