कॉंग्रेस संपली, आता अपेक्षा राहिल्या नाहीत : ओवेसी

हैदराबाद – ‘संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काढल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी RSSच्या दारावर डोके टेकले. आता काँग्रेसकडून काहीच अपेक्षा राहिल्या नाहीत. आता काँग्रेस संपली आहे,’ अशी टीका एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवल्यामुळे ओवेसी यांनी नाराजी दर्शवली आहे.

हैदराबादमधील एका जाहीरसभेत बोलताना ओवेसी यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवला. ”काँग्रेस आता संपली आहे. ज्या व्यक्तीनं आयुष्यातील 50 वर्ष काँग्रेस पक्षात काढली. ज्यांनी देशाचं राष्ट्रपती पद भूषवलं. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आपले डोके टेकवलं. अशा पक्षाकडून तुम्हाला आताही अपेक्षा आहेत?”, असा प्रश्नदेखील ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

You might also like
Comments
Loading...