आसाराम लोमटे यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर

परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहाकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.साहित्य विश्वातील मानाचा समजाला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहाला मराठी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली.

खेड्या-पाड्यातील कथा आणि व्यथा काळजाला भिडणाऱ्या शब्दांमधून मांडत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आसाराम लोमटेंना पुरस्कार घोषित झाल्याने मराठी साहित्य विश्वात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

C0ME-fTXcAIn7vE

लेखनातील ग्रामीण बोली, गावाकडच्या माणसांच्या जगण्यातील खाच-खळगे, शेतकऱ्यांची स्थिती, दिनदुबळ्यांची व्यथा आणि त्या व्यथांशी लढणारी माणसं इत्यादी सारं आपल्या लेखनात मांडून कथेला थेट काळजाशी भिडवणारे आसाराम लोमटे हे वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.

आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहातून ग्रामीण भागाचं चित्रण करण्यात आलं आहे. यातील सुंदर कथांमुळे वाचकांचीही या पुस्तकाला मोठी पसंती मिळाली आहे. 22 फेब्रुवारी 2017 रोजी साहित्य अकादमी पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असं ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचं स्वरुप आहे. २२ फेब्रुवारीला या मानाच्या पुरस्काराचं वितरण एका समारंभात करण्यात येणार आहे.

साहित्य अकादमी जाहीर झाल्यानंतर आसाराम लोमटेंची प्रतिक्रिया

“आलोक कथासंग्रहातून समकालीन ग्रामीण जगणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आजूबाजेच जे भीषण वास्तव आहे, ते साहित्यात मांडणं गरजेचं आहे. किंबहुना संवेदनशील लेखकाचे ते कर्तव्यच आहे.”, असे एबीपी माझाशी बोलताना आसाराम लोमटे म्हणाले.