अखेर आसाराम दोषी; जोधपुर विशेष न्यायालयाचा निर्णय

जोधपूर: बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज जोधपुर विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २०१३ च्या बलात्कार प्रकरणी आसारामसह सर्व आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी आसारामला १० वर्षाची शिक्षा होऊ शकते.

आसाराम गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात आहे. आज न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये २१ एप्रिलपासून १० दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.

साक्षीदारांच्या हत्या

आसारामबापूच्या समर्थकांनी साक्षीदारांना लक्ष्य करत. प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि आसाराम बापूचा सेवक अमृत प्रजापती यांच्यावर २३ मे २०१४ मध्ये राजकोटमध्ये गोळीबार केला होता. अमृत प्रजापती आसाराम बापू यांच्या आश्रमात काम करत होते.

आसाराम बापूंना लहान मुलांसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघणारे प्रजापती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. २००५ मध्ये त्यांना आश्रमातून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी आसाराम बापू यांच्याविरोधात रण पेटवले होते.

अखिल गुप्ता (वय ३५) याची सुद्धा आसारामबापूविरोधात साक्ष दिल्यामुळे हत्या करण्यात आली होती. अखिल गुप्ता हे आसाराम बापूचे माजी खानसामा व सहकारी होते. राहुल सचान हा साक्षीदारही बेपत्ता झाला होता. या प्रकरणी महेंद्र चावला यांच्यावरही मे २०१५ गोळीबार करण्यात आला होता. बलात्कार प्रकरणात आसारामबापूंविरोधात साक्ष देणाऱ्या तीन जणांची हत्या करण्यात आली. तर ४ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Shivjal