‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने आंबेडकरांवरचे खरे प्रेम सिध्द करावे’

टीम महाराष्ट्र देशा- याआधी भारीपसोबत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस संपर्कात होती. एमआयएम हा जातीय पक्ष असल्याने त्यांची साथ सोडून आमच्यासोबत या असा आग्रह कॉंग्रेसकडून धरला जात होता. आता ओवेसी यांनी टाकलेल्या एका गुगलीने कॉंग्रेस क्लीन बोल्ड झाली आहे.

कॉँग्रेसला आमचे एवढेच वावडे असेल तर आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या सन्मानासाठी व प्रतिष्ठेसाठी एकही जागा मागणार नाही. मात्र वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉँग्रेसने आंबेडकरांवरचे खरे प्रेम सिध्द करावे असं जाहीर आव्हान एमआयएमचे नेते व खा.असिदोद्दिन ओवेसींनी दिले आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीने एमआयएमचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश झाला होता. आता ओवेसींनी केलेल्या घोषणेने पुन्हा एकदा नांदेड राज्याच्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहे.