मोहन भागवत काय सरन्यायाधीश आहेत का? -ओवेसी 

भागवतांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्याचा घेतला ओवेसींनी समाचार 

टीम महाराष्ट्र देशा: कोणत्या अधिकाराने मोहन भागवत अयोध्येत मंदिर उभारणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित करत राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात येईल या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दाव्याचा एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे .हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत काय सरन्यायाधीश आहेत का? ते कोण आहेत, अशा शब्दांत त्यांनी भागवतांवर शाब्दिक प्रहार केला.

दरम्यान, ५ डिसेंबर रोजी अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशात मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कर्नाटकच्या उडपी येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत भागवत यांनी राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारणार असल्याचे म्हटले होते. राम मंदिरच्या वर एक भगवा झेंडा फडकेल. राम जन्मभूमीवर दुसऱ्या कशाचेही बांधकाम उभारले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते.