अमित शहा गृहमंत्री आहेत, देव नाहीत : असदुद्दीन औवेसी

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मोदी सरकारकडून विविध योजनांवर आणि विधेयकांवर चर्चा होत आहे. तर चर्चे वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. सभागृहात असेचं काहीसे चित्र पाहायला मिळाले होते. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि असुदुद्दीन औवेसी या दोघांमध्ये खडाजंगी पाहिला मिळाली होती. लोकसभेत एनआयए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक मजबूत बनविणारे सुधारणा विधेयक खासदार सत्यपालसिंह मांडत होते.

त्याचवेळी, एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेत सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर औवेसी साहब सुनने की ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा.. असे म्हणत अमित शहा यांनी औवेसींना दम भरला होता.

या प्रकाराला असदुद्दीन औवेसी यांनी प्रतिउत्तर दिले आहे ‘जे कोणी भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाचे समर्थन करत नाही अशांना देशद्रोही बोललं जातं. भाजपाने देशद्रोही बनविण्याचं दुकान उघडलं आहे का? गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याकडे बोट दाखवून धमकी दिली असा आरोप केला. तसेच शहा हे फक्त गृहमंत्री आहेत. ते देव नाहीत. त्यांनी पहिलं नियम वाचावा असा टोला त्यांनी अमित शहांना लगावला.