fbpx

विधानपरिषदेच्या मतदानानंतर एमआयएम मध्ये पडली ठिणगी, नगरसेवकांनी मागितली ओवेसींची वेळ

औरंगाबाद : स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी केलेले मतदान हा विषय चांगलाच तापला आहे. एमआयएमने शिवसेनला मदत केल्याची सर्वत्र चर्चा होत असल्यामुळे पक्षात वादळ उठले आहेत. यामुळे मतदान केलेले सर्व नगरसेवक एकवटले असून ते लवकरच एमआयएमचे पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार आहेत. यासाठी या नगरसेवकांनी वेळी मागितली असल्याची माहिती समोर येत आहेत.

19 ऑगस्टला औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना मदत केल्याची बोलले जात आहेत. या निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार नव्हता. तसेच पक्षाने कोणालाही पाठिंबा दर्शविला नव्हता असे असतानाही नगरसेवकांनी मतदानाच हक्‍क बजावला होता. यासह मतदानाच्या पुर्व संध्येला शिवसेना उमेदवारांकडून एमआयएच्या नगरसेवकांची भेट घेण्याची आल्याची माहिती समोर येत आहे. यात यशोचित मान सन्माद देण्याचा प्रकार झाल्याचीही चर्चा होत अहोत.

यासाठी दोन नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता. पुढाकार घेणाऱ्यांच्या सांगण्यावरुन बाकीच्यांनी मतदान केले. मात्र त्या नगरसेवकांकडून मतदान करणाऱ्यांचा डबल गेम केल्याची चर्चा होत आहे. यामुळे गटनेत्यासह नासेर सिद्दीकीसह दोन नगरसेवकांच्या विरोधात थेट मोर्च बांधणी सुरु करण्यात येत आहे. याची तक्रार मतदान करणारे नगरसेवक पक्षाध्यक्ष खासदार ओवेसीकडे करणार असल्याचेही माहिती समोर येत आहेत.

महत्वाच्या बातम्या