मी तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम : ओवैसी

asaduddin-owaisi

टीम महाराष्ट्र देशा : एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये तळ ठोकला आहे.  यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मी रझाकर नाही, तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम आहे. असा टोला लगावला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले ओवैसी ?

आतंकवाद संपवण्याची भाषा करणार्यांनी भोपाळ मधून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. शहीदांचा अपमान करत असताना तुम्ही गप्प कसे असा सवालही ओवैसी यांनी केला. एवढेच नाही तर प्रकाश आंबेडकर आणि मी सोबत लोकसभेत जावून संविधानाचे रक्षण करू असेही ते म्हणाले.

मुस्लीम आणि दलित बांधवांचे प्रश्न मांडण्यासाठी औरंगाबादकरांपुढे आमदार जलील यांच्यासारखा विश्वासार्ह चेहरा दुसरा कोणता नसून विकासासाठी त्यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.