ट्रकभरून लिंबू पाकिस्तानच्या सीमेवर टाका संकट येणार नाही : असदुद्दीन ओवेसी

नांदेड : एक- दोन ट्रक लिंबू, मिर्ची पाकिस्तानच्या सीमेवर टाका, कुठलेही संकट येणार नाही, अशी उपहासात्मक टिका पाकिस्तानचे नाव न घेता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राफेल प्रकरणावरून भाजपवर केली आहे.

ओवेसी यांनी बुधवारी रात्री नांदेड येथे एमआयएमच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी ते बोलत होते, ओवेसी म्हणाले, की तुम्ही लिंबू, मिर्चीचा वापर संकट टळण्यासाठी करता आम्ही लिंबूचा वापर शरबतासाठी आणि मिर्चीचा वापर खिम्यात टाकण्यासाठी करतो. लिंबू, मिर्चीचं उदाहरण देत भाजप अंधश्रध्देला खतपाणी देत असल्याचा आरोप ओवेसी यांनी केले.

11 कोटी मते मुस्लिमांची

काँग्रेसचे व्होट बँक भाजपकडे गेली आहे. लोकसभा निवडणूकीत संपूर्ण देशातून काँग्रेसला अकरा कोटी मतं मिळाली त्या पैकी सात कोटी मतं ही मुस्लिमांची होती, अशी टिका ओवेसी यांनी केली. देशात काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे. काँग्रेसला पुन्हा अस्तित्व निर्माण करणं शक्य नाही. 2014 आणि 2019 मध्येही काँग्रेसच्या चुकांमुळे मोदी पंतप्रधान झाले असल्याचा घणाघातही ओवेसींनी केला.

महत्वाच्या बातम्या