भडकाऊ घोषणा देणाऱ्या अनुराग ठाकूरांना असदुद्दीन औवेसींचे खुले आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : ‘देशातील कुठलीही जागा सांगा आणि त्याठिकाणी येऊन मला गोळी मारा,’ असं आव्हान एआयएमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांना दिलं आहे. दिल्लीतील निवडणूक प्रचारसभेत अनुराग ठाकूर यांच्या ‘गोळी मारो वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

नागपाडा येथील झूला मैदान येथे व्हॉईस ऑफ इंडिया आयोजित कार्यक्रमात औवेसी म्हणाले, ‘ तुमच्या वक्तव्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण होणार नाही कारण आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.देश वाचविण्याची आणि गांधींची तत्त्वे जिवंत ठेवण्यासाठी हा लढा आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि गांधी-आंबेडकरांचा विचार ठेवण्यासाठी या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

Loading...

दरम्यान, ठाकूर त्यांचं वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने ठाकूर यांना वादग्रस्त घोषणांबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग गद्दार असा ट्रेंड सुरु आहे. याबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन अनुराग ठाकूर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...