लक्षणे सारखीच असल्याने कोरोनासोबतच डेंग्यूचीही करा तपासणी, औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूचना!

औरंगाबाद : सध्या कोरोनाचे दररोज पंधरा ते वीस रुग्ण निघत आहेत. मात्र पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू आणि मलेरियाचा धोका कायम आहे. ताप, सर्दी आणि खोकला ही कोरोनाचीही प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ आणि कोरोना आणि डेंग्यू या दोघांचीही तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. मात्र अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान बालकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या पावसाळाच्या धर्तीवर शहरात डेंग्यू आणि मलेरिया ची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने कागदोपत्री धूर फवारणी, अबेटिंग ही मोहीम दाखवली असली तरीही अजूनही शहरातील निम्मे भाग फवारणी विनाच आहे.

शहरात सध्या कोरोनाचे दररोज दहा ते वीस दरम्यान रुग्ण आढळून येत आहे. दोन हजार दरम्यान कोरोना चाचण्या होत आहेत. तरीही पॉझिटिव्ह रुग्ण बोटावर मोजण्याइतके आढळून येत आहे. त्यासोबच पावसाळा सुरू झाल्याने मलेरिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार वाढण्याचा धोका आहे. अद्यापपर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. जुलै महिन्यात सहा संशयीत सापडले असून जानेवारीपासून आतापर्यत ३० संशयीत आढळले आहेत.

आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पालिकेने तयारी सुरू केली आहे. सोबतच मलेरिया, डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका आहे. कोरोना आणि डेंग्यूची प्राथमिक लक्षणे सारखीच आहे. सर्दी, खोकला, ताप येणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तातडीने कोरोना आणि डेंग्यूची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले. कोरोनाची प्राथमिक लक्षणे ही सर्दी, खोकला, ताप येणे ही आहेत. दोन ते तीन दिवस अंगातील ताप हा कमी होतो आणि पुन्हा वाढतो. वास येत नाही, चव लागत नाही. ही लक्षणे दिसून येतात.

महत्त्वाच्या बातम्या

IMP