सत्ताधारी म्हणून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार- चित्रा वाघ

मुंबई:   भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांवरील वाढत्या आत्याचारासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी युवक आघाडीचे अध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. राऊतांनी साकीनाका बलात्कार प्रकरणावरून भाजपवर सामनातून निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर वाघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘तुमची दुटप्पी भूमिका चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची दखल भाजप घेणार आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारणार सत्ताधारी म्हणून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हाथरस, कथुआ अशा सर्व प्रकरणाबाबत आम्हाला संवेदनशीलता आहे. पण महाराष्ट्र ही आमची जन्मभूमी आहे. आमची नाळ इशं जोडली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

राज्यातल्या महिलांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आणण्याच्या तुम्ही गप्पा मारता, मात्र तो फक्त नावापुरता राहिला आहे. एफआयआर होत नाहीत त्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागत आहे. आज बलात्कारीच म्हणतायत आम्ही बलात्काऱ्यांना सोडणार नाहीत. हा तर जोक ऑफ द डे झाला, असं राऊतांना सुनावताना चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महेबूब शेख यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान, राज्य सरकार महिला अत्याचारांच्या प्रकरणाबाबत हलगर्जीपणा करत असल्याची तक्रारही यावेळी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या :