टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभा निवडणुका आणि देशाच्या सीमेवर होणाऱ्या गोळीबाराचा संबंद जोडत एक ट्विट केले आहे. आव्हाड यांच्या या ट्विटमुळे एका नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यात आहे.
जेंव्हा पासून निवडणुका संपल्या आहेत तेंव्हा पासून सीमेवरील गोळीबाराच्या बातम्या पण बंद झाल्या आहेत. अश्या अशयाचे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांच्या या ट्विटमुळे एका नव्या वादाला तोंडफुटू शकते.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 9, 2019
लोकसभा निवडणुकी आधी पुलावामात दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच्या काही दिवसानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये जात दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. त्यावेळी सीमेवरील गोळीबाराचे अनेक वृत्त येत होते. परंतु लोकसभा निवडणुकी नंतर सिमेवरील गोळीबाराचे एकही वृत्त आले नाही.
दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीचा आणि सीमेवरील गोळीबाराचा संबंध जोडत एक ट्विट केले. त्याच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंडफुटनार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.