मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक काल बोलवण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला गेला होता.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आणि त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे हे या कडक लॉकडाऊनची घोषणा करतील अशी माहिती सध्या मिळत आहे. यावर भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
‘उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ‘महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार’ याच भूमिकेतून आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी सुचवल्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री ‘लॅाकडाऊन’ हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडतील आणि आज संध्याकाळी आपले ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करतील, अशी तमाम महाराष्ट्राला अपेक्षा आहे.’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नांदेड मध्ये कोरोनावाढीस पालकमंत्री जबाबदार; खा. चिखलीकरांचा मंत्री अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- ‘…पण रक्ताचं नातं गमावलेल्यांसाठी या यंत्रणेकडे शेवटपर्यंत तरी उत्तर असेल?’
- बेशिस्तांवर कारवाईसाठी पोलिसांचा नवा फंडा ,तृतीयपंथींची फौज तैनात
- ऑक्सिजन टँकमुळे घाटीत वाढणार २०० बेड
- नांदेड येथे आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात