सिंधदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची (Dindhudurg District Co-operative Bank Election) लढत मोठ्या चुरशीची ठरल्याचे पाहायला मिळाले. आज या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचा सुपडा साफ केला आहे. ऐतिहासिक वाद असणाऱ्या राणे आणि शिवसेनेत थेट लढत असलेल्या या निवडणुकीत राणेंनी (Nitesh Rane) सिंधदुर्गचा गज राखला आहे.
भाजपने शिवसेनेला धूळ चारल्यानंतर आता राणे समर्थकांकडून पुन्हा एकदा म्याव म्याव करत सेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सिंधदुर्गमध्ये पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचे सिंधदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला. सतीश सावंत यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात जात असताना पायऱ्यांवर बसलेल्या भाजपच्या नेत्यांपैकी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज करत खिल्ली उडवली होती. त्यावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा मोठा वाद निर्माण झाला होता. सभागृहामध्ये देखील या घटनेचे पडसाग उमटल्याचे पाहायला मिळाले. मात्र सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. यावर आता शिवसेना नरमाईची भूमिका घेणार की भाजपला सडेतोड उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- ‘वस्तू व सेवाकर परिषद’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
- “धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती…”, निलेश राणेंची विजयावर प्रतिक्रिया
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<