मुंबई विमानतळ ताब्यात येताच अदानींनी मुख्यालय अहमदाबादला हलवले

मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) देण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या (मिआल) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

त्यानंतर आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवले आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असे काहीसं चित्र निर्माण झाले आहे.

जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. तसेच बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाचा ताबाही एएचएलकडे गेला आहे. मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलने मुंबईत मुख्यालय थाटले होते. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन व्यवस्थापन पूर्ण होताच मुंबईतील गाशा गुंडाळत मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP