आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होताच मुंबई म्हणते,’पिक्चर अभी बाकी है दोस्तों’

मुंबई : मे महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावून स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली. यानंतर उर्रवीत आयपीएल स्पर्धेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहीले. यावर बीसीसीआयने काही दिवसातच आढावा बैठक बोलावून आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएईत होणार असल्याची घोषणा केली.

आयपीएल स्पर्धेच्या २०२१ उर्वरीत हंगामातील पहिला सामना हा कट्टर प्रतिद्वंदी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. स्पर्धेच्या उर्वरीत हंगामाची घोषणा होताच मुंबई इंडियन्सने एक भन्नाट ट्विट केले आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत बॉलीवूडमधील ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील एक संवाद पोस्ट केला आहे. ‘पिक्चर अभी बाकी है दोस्तों’ असा संवाद पोस्ट करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत मुंबई इंडियन्सचे कोणत्या तारखेला कोणत्या संघासोबत सामने आहेत. याची माहिती दिली आहे. आयपीएल २०२१च्या उर्वीरीत हंगामात मुंबईचा पहिला सामना सीएसकेसोबत आहे. यापुर्वी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा ४ गडी राखुन पराभव केला होता. या सामन्यात चेन्नईने दिलेल्या २१८ धावांचे लक्ष्य मुंबईने चार गडी राखुन पार केले होते. आयपीएल २०२१च्या पहिल्या हंगामातील तो सर्वोत्कृष्ट सामना होता.

महत्त्वाच्या बातम्या