भारतीय चाहत्यांनी फिरकी घेताच टीम पेनचे एक पाउल मागे

मुंबई : या वर्षाच्या सुरुवातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दैदीप्यमान यश मिळवत कांगारुचा त्यांच्याच घरात २-१ असा पराभव केला. भारताने ३२ वर्षानंतर गाबा कसोटीत विजय मिळवुन ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात चारीमुड्यां चित केले. कर्णधार अजिंक्य रहाणेने चलाखीने नेतृत्व करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवुन दिला.

मालिका संपल्यानंतर आता काही महिन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने भारतीय खेळाडूवर शेरेबाजीचा आरोप केला. भारतीय खेळाडूंनी शेरेबाजी केल्यामुळे आमचे लक्ष विचलीत झाले. आणि आम्ही सामना गमावला असे आरोप त्याने भारतीय संघावर लावला. या आरोपानंतर टीम पेनची भारतीय चाहत्यांनी टीम पेनची चांगलीच फिरकी घेत त्याला ट्रोल केले. यानंतर टीम पेनने यु टर्न घेत, ‘मी जे बोललो त्यात असेही बोललो की भारतीय संघ हा विजयाचा दावेदार होता. त्यामुळेच भारताने आम्हाला पराभूत केले.’ असे म्हणत स्वत:ची बाजु सावरण्याचा प्रयत्न केला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऍडलेड कसोटीत अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले होते. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न व ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत युवा भारतीय संघाने २-१ असा ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार टिम पेनला कर्णधार पदावरून हटविण्याची मागणी पुढे आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP