कार्यकारणी जाहीर होताच पंकजा मुंडेंनी केले ‘ते’ ट्विट डिलीट, राजकीय चर्चांना उधान

blank

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना राज्यात प्रदेश उपाध्यक्षा करण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे केंद्रात आणि प्रीतम मुंडे राज्यात अस चित्र पक्ष स्तरावर तरी पाहायला मिळणार आहे. यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार का ? यावर निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.

…तर इंदुरीकर महाराजांना होणार शिक्षा, सरकारी वकिलांचा दावा

गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी कार्यकारिणीच्या प्रमुख पदांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे.

 

दरम्यान, पंकजा मुंडे यांना बढती दिली आहे की राज्यातील राजकारणातून वगळलं जातंय, अशी चर्चा राजकारणात सुरु झाली आहे. पंकजा मुंडे या मूळ हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि कट्टर स्वरुपाच्या राजकारणी आहेत. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनीही खडतर हिंदुत्वावादी भूमिका निभावली होती. पण ते राजकीय पुढारी नव्हते. त्यामुळे पंकजा मुंडेंचा काहीही वापर भाजपच्या राजकारणासाठी होत नव्हता. त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जमेनासे झाले होते. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांचा राज्यातून काटा काढला गेलाय का ? अशी चर्चा सुरु आहे.

यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर पहिली प्रतिक्रिया दिली. “भाजपच्या नवीन टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार,” असे ट्विट पंकजा मुंडेंनी केले आहे. मात्र केंद्रात नक्की कोणती जबाबदारी मिळणार याबद्दल पंकजा मुडेंनी बोलणं टाळल्याचे पाहायला मिळत आहे.

जेव्हा इंदिरा गांधी लेहला गेल्या होत्या, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते- कॉंग्रेस

मात्र यानंतर पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलं होत त्यात त्यांनी प्रीतम मुंडे यांना आशीर्वाद देत ‘मुंडे-महाजनांच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बजावशील’ अस म्हंटल होत. मात्र काही वेळातच पंकजा मुंडे यांनी ते ट्विट डिलीट केले आहे. पंकजा मुंडे यांनी ते ट्विट नेमकं का डिलीट केले याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला सुरवात झाली आहे.

pankaja munde