कॉंग्रेस नेत्यांनी भेट घेताच फडणवीस पोहचले थेट मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला

uddhav thackrey

मुंबई : काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत. तर आता काँग्रेसकडून काल रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखलकेलेला आहे.

दरम्यान एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काल म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे माहिती सध्या मिळत आहे. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान आता या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही भेट नेमकी कुठल्या मुद्द्यावर होत आहे याबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या