Share

Rutuja Latake। ऋतुजा लटके यांना कोर्टाचा दिलासा मिळताच शिंदे गट खेळणार मोठा ‘डाव’, आज रात्री महत्वाची बैठक

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेला  राजीनामा देऊनही अद्याप स्वीकारला नाहीय. परंतू मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ठाकरे गटाला आनंद झाला आहे.

हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत. उद्या फॉर्म भरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. नवं चिन्ह आहे ,माणसं जुनी आहेत अशा शब्दात ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच त्यांच्यासोबत रमेश लटके यांचा आशीर्वाद असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्या भावुक झाल्या.

ठाकरे गटाकडून उद्या ऋतुजा लटके उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर आता शिंदे गटाकडून उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिंदे गट पुढील खेळी करण्याच्या तयारीत आहे. आज रात्रीतूनच शिंदे गटातर्फे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजप मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याची आतापर्यंत चर्चा होती. मात्र भाजपच्या वतीने अधिकृतपणे असं काहीही सांगण्यात आलेलं नाही. मुरजी पटेल यांनाच शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे केले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. शिवसेनेतर्फे रमेश लटके येथे उभे होते. त्यावेळी मुरजी पटेल यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी पटेल यांचा पराभव झाला होता. आता पटेल यांनाच रमेश लटकेंच्या पत्नीविरोधात उभे करण्याचा प्लॅन भाजपचा होता. आता शिंदेसाठी भाजप हा उमेदवार सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics