fbpx

जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता- मोहन भागवत

mohan bhagavat on raygad

रायगड: जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले. ते रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, अन्याय, शोषण यांच्या मुक्तीसाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत. संघटीत शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शक पुस्तक आहेत.

त्यांनी चेतना, संकल्प, सद्गुण जागवले, त्यांनी कधीच भेदभाव केला नाही, हा अमूकची पूजा करतो, तो तमूकची पूजा करतो म्हणून भेद केला नाही. तसेच पुढच्या वर्षी स्मृतीदिनी रायगडावर मोठ्या संख्येने उपस्थीत व्हा कारण शिवरायांना विसरून भारताचं उत्थान शक्य नाही. असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.