अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन होताच, तालिबानी नेत्यांमध्ये श्रेय मिळविण्यासाठी वाद

taliban government

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळविल्यानंतर आता तेथील नेत्यांचे परस्परांमध्ये वाद सुरु झाले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी काबूलच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये वाद झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रतिस्पर्धी गटांच्या समर्थकांमध्ये प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये भांडण झाले.

तालिबानचा सह-संस्थापक आणि उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादार अनेक दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. तसेच बरादार आणि नवीन कॅबिनेटमधील मंत्री आणि हक्कानी नेटवर्कचे सर्वोच्च नेता खलील उर रहमान हक्कानी यांच्या अनुयायांमध्ये वाद झाले. तसेच अफगाणिस्तानमधील विजयाचे श्रेय कोणाचे यावरून हे वाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तालिबानमध्ये अनेक पातळ्यांवर मतभेद आहेत. कंदाहार प्रांतातून आलेले तालिबानी नेते आणि उत्तर आणि पूर्व अफगाणिस्तानमधील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून बरादार सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. यामुळे गोळीबारात तो जखमी किंवा मरण पावल्याच्याही अफवा पसरविण्यात येत होत्या.

महत्त्वाच्या बातम्या