संघात निवड होताच इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने सराव सामन्यात भारताविरुद्ध ठोकले शतक

मुंबई : पुढील महिन्यात भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला या सामन्यापासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ चांगली सुरुवात करण्यास उत्सुक आहेत.

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा करताच संघात पुनरागमन करणाऱ्या हासीब हमीदने धडाकेबाज खेळी केली आहे. भारताविरुद्ध डरहन येथे सुरु असलेल्या सराव सामन्यात सलामीवीर हासीब हमीदने २४६ चेंडुत १३ चौकारासह ११२ धावांची धडाकेबाज खेळी केली आहे. त्याची ही खेळी भारतासाठी धोक्याचा इशार ठरु शकते.

भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर यांच्याविरुद्ध ही खेळी केल्यामुळे हमीदचा आत्मविश्वास दुणावला असेल. तर भारतासाठी आगामी मालिकेपुर्वी ही धोक्याची घंटा असु शकते. यापुर्वी हमिदने २०१६ मध्ये भारतीय दौऱ्यावर पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्याने भारताविरुद्ध ८२ धावांची झुंझार खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP