वडिलांचे मला देशाकडून खेळताना पाहण्याचे स्वप्न होते म्हणून… 

सिराज

ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो भारतीय संघासोबत सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियामध्येच असताना त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता.

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शनिवारी एक पत्रक प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की बीसीसीआयने मोहम्मद सिराजशी चर्चा केली आहे. बीसीसीआयने सिराजला भारतात परत येण्याचा पर्याय दिला, पण या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने मोहम्मद सिराजने घेतलेल्या या निर्णयाचा आदर केला आणि या कठीण काळात सिराजचे सांत्वन केले आहे.

सिराजने आपल्या वडिलांच्या स्वप्नामुळेऑस्ट्रेलियामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या निधनानंतर तो शुक्रवारी म्हणाला होता की, “माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि मी ते नक्कीच करेन. माझ्या पाठीशी नेहमी उभा असलेला एक भक्कम आधार मी आज गमावला. हा एक अतिशय दुःखदायक क्षण आहे. मला देशाकडून खेळताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते.”

महत्वाच्या बातम्या