‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस…’

uddhav thakrey

सिंधुदुर्ग : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबंधित करून कोरोना नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरेंच्या कालच्या संवादावर भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्राचं फक्त कोरोना इतक्या झपाट्याने पसरत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं घरात बसणं हेच कारणीभूत असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘जगामध्ये असा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत हा माणूस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस कोरोना जाऊ देणार नाही. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्याला घरीच बसायला आवडतं.’ असा प्रहार निलेश राणे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ‘मी जबाबदार’ मोहिमेची घोषणा !

दरम्यान, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानानंतर ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. आपण आपली जबाबदारी ओळखून वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे या मोहिमेत आपण स्वतः सर्वानी पाळायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या