‘जो पर्यंत मोदी आहे तो पर्यंत आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील’

टीम महाराष्ट्र देशा : पहिल्या दोन टप्यातील मतं मतपेटीत बंद झाले आहे तर मंगळवारी तिसऱ्या टप्यातील मतदान देखील पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष चौथ्या टप्यात होणाऱ्या मतदानाकडे लक्षकेंद्रित करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली.

यावेळी मोदींनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य केले असून येणाऱ्या दिवसात ऊसाला चांगला भाव मिळावा यासाठी ऊसापासून इथेनॉल तयार करण्याचे कारखाने सुरु करणार असल्याच आश्वासन दिले. तर जो पर्यंत मोदी आहे तो पर्यंत आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील असा विश्वास जमलेल्या समुदायाला दिला.

मोदी म्हणाले की, नियत साफ राहिली तर देशाच्या नितीला ही चांगल्या पध्दतीने राबविता येवू शकते. बांबू उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देणार. शेतकरी सन्मान योजनेचा ऐतिहासिक निर्णय आहे. या योजनेची व्याप्ती वाढविणार असून 5 एकरची अटच रद्द करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप कडून विद्यमान खासदार हीना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांना टक्कर देण्यासठी आघाडीकडून कॉंग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी कडून नंदुरबार लोकसभा मतदार संघातून माणिकराव गावित यांच्या मुलाला उमेदवारी न दिल्याने नाराज माणिकरावांनी पक्ष त्यागाची भूमिका घेतली होती. त्यामुळे माणिकराव  गावित हे सध्या जरी कॉंग्रेसमध्ये असले तरी त्यांची या लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका असणार आहे आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे हे निर्णयक ठरणार आहे.Loading…
Loading...